आमची 30,000 लिटर्स / दिन क्षमते ची निरंतर आंबवणी प्रकिया आसवणी आहे. स्पेंट वॉश व॑रील सेंद्रीय भार कमी करण्या करिता बायो डायजेस्टर बसविलेला आहे.  हा  बायो डायजेस्टर  स्पेंट वॉशचे विघटन करुन मिथेन वायू तयार करतो जो बाष्पका मध्ये इंधन म्हणून वापरला जातो. आमच्या कारखान्याने  प्राथमिक प्रकियेतून निर्माण होणार्या  स्पेंट वॉश च्या दुय्यम प्रकिये करिता शास्त्रिय 'सरफेस कंपोस्टींग पध्द्तीचा अवलंब केला आहे. प्रेस-मड, स्पेंट वॉश व मायक्रोबियल कल्चर चे योग्य रितीने मिश्रण होण्याकरिता मिक्सींग मशीन चा वापर केला जातो. ही मिश्रण प्रकिया निरंतर 35  दिवस चालते व  त्यानंतर 10  दिवस क्युरिंग साठी दिले जातात.
            आमच्या सातार्डे येथील कंपोस्ट यार्डची 6,000 मे.टन/सायकल प्रेसमड हाताळण्याची क्षमता आहे. संपूर्ण यार्डची बांधणी  सी.आर.इ.पी. नॉर्म प्रमाणे आहे. यार्ड मधून 18,000  मे.ट्न/ प्रती वषॅ ऊत्पादन होते.
         
        
            एरोबिक बायो कंपोस्टींग प्रकियेची वैशिष्ठे
			
				-  प्रदूषंण विरहित
 
				-  वासविरहित
 
				-  डिस्ट्रक्शन ऑफ सी.ओ.डी/बी.ओ.डी. ऑफ दी एफ्ल्युएंट
 
				-  हाय प्रॉडक्ट वॅल्यु