आमच्या कारखान्याने कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्रा सभोवतालच्या परिसराचा विकास करण्यासाठी खंबीर पावले उचलली आहेत. या परिसराचा विकास हे कारखाना आपले सामाजिक उत्तरदायित्व समजतो. कारखान्याने नेहमीच शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रिडाविषयक चळवळींना सक्रिय पाठिंबा व प्रोत्साहन दिले आहे. या योजने अंतर्गत कारखान्यामार्फत एक शाळा, दवाखाना, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन तसेच एक कुस्ती संकुल देखील चालविले जाते.
१९८३ मध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्रा सभोवतालच्या परिसराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्रिडा विकास करण्यासाठी तसेच या परिसरातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कारखान्याशी संलग्न 'कुंभी कासारी प्रतिष्ठान' या नावांने एका विश्वस्त न्यासाची स्थापना केली गेली. विश्वस्त न्यासाचे उद्दिष्ट शैक्षणिक उत्क्रांती घडवून आणण्या बरोबरच लघु व मध्यम उद्योजकांना आवश्यक ती मदत पुरविणे आहे. जरी न्यासा ने वैक्तिगत व संघटनांत्मक पातळीवर आपल्या मदतीचा हात पुढे केला असला तरी खेळ, क्रिडा, शिक्षण आणि कलेसाठी एक स्वतंत्र संस्थेची निर्मिती केली आहे व त्या अनुषंगाने न्यासाने १ जुलै २००२ पासून महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 'कुंभी कासारी विद्यानिकेतन' या नावांने एक माध्यमिक शाळा सुरु केली आहे.
ऊस उत्पादकांच्या मुलांना, सभासदांच्या मुलांना, कारखाना कर्मचार्यांच्या मुलांना तसेच गरीब व गरजू पाल्यांना दर्जेदार व आधुनिक काळाशी सुसंगत शिक्षण माफक दरात मिळावे यावर न्यासाचा विश्वास आहे. सर्व शिक्षणार्थीना त्यांची जात/धर्म असा भेदाभेद न करता राहण्याची व्यवस्था, शिक्षणासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक शिष्यवृती, बक्षिसे, विद्यावेतन पुरविणे हे न्यासाचे उद्दिष्ट आहे. शेतकर्यांना प्रयोगशील व संशोधनात्मक शिक्षणाशी परिचीत करण्याबरोबरच व्यावसाइक शिक्षणाशी त्यांना अवगत करणे हेही न्यासाचे उद्दिष्ट आहे.
कारखाना परिसरामध्ये कारखान्यामार्फत एक सुसज्ज १० वी पर्यंत शिक्षण देणारी शाळा चालविली जाते.कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात.
- शाळेला स्वतः ची प्रशस्त इमारत व भव्य पटांगण आहे.
- फक्त सभासदांच्या पाल्यांना शाळेत प्रवेश दिला जातो.
- शाळेचा शिक्षकवर्ग उच्य अह्रताप्राप्त व प्रशिक्षीत आहे.
- शाळेकडून सामाजिक, सांस्कृतिक [ एक्स्ट्रा करिक्युलर ऐक्टि -व्हिटिज ] उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.
- शाळेच्या स्थापनेपासूनच व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांची राहण्याची सुविधा केली आहे.
- शाळेच्या भोजनालयात १२५ विद्यार्थ्यांची भोजनाची व्यवस्था आहे.
कारखान्याचे स्वतः चे बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन [कल्चरल हॉल] आहे. या भवनाचा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, लग्न समारंभासाठी, तसेच धार्मिक कारणांसाठी उपयोग केला जातो. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तसेच परिसरातील लोकांना हे भवन अत्यंत सोईचे व किफायतशीर शाबीत झाले आहे.
दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. कुस्ती स्पर्धेतील यश्वस्वी मल्लांना रु. २५० प्रती महिना ते रु. १,३,०० प्रती महिना मानधन दिले जाते. कारखान्याने क्रिडा उपक्रमांना नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला आहे तसेच क्रिडापटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर भाग घेता यावा याकरिता आर्थिक मदती बरोबरच प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.
कुंभी-कासारी कार्य स्थळावर जून 2005 साली नेमबाजी खेळाची सुरुवात कारखान्याचे अध्यक्ष मा.आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शना खाली झाली व कै.डी.सी.नरके विद्यानिकेतन येथील शेडमध्ये नेमबाजी रेंज उभी करण्यात आली. सुरुवातीला 5 विद्यार्थ्यांनी या खेळाचे प्रशिक्षण मार्गदर्शक युवराज चौगले (राष्ट्रीय नेमबाज) यांच्याकडे घेण्यास सुरुवात केली. सन 2005-06 मध्ये जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा घेतल्याने या स्पर्धेची ग्रामीण भागात माहिती होवू लागली. पण खऱ्या अर्थाने जून 2007 सालापासून या खेळाने ग्रामीण भागात जोर धरला व 2007 सालापासून कै.डी.सी.नरके शाळेतील व ग्रामीण भागातील खेळाडूंनी यश संपादन केल्याने या खेळाची माहिती सर्वसामान्या पर्यंत पोहचली. यादृष्टीने मा.आमदार चंद्रदीप नरके यांनी कै.शशिकांत नरके यांचे स्मरणार्थ स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग व रत्नागिरी या भागातून खेळाडू येत आहेत.
फेब्रुवारी 2014 मध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी कारखाना कार्यस्थळावर अध्यावत नेमबाजी केंद्राची उभारणी केलेली आहे.
या माध्यमातून कुंभी कासारी परीसरातील व जिल्हयातून प्रशिक्षण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी राज्यस्तर व 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पदक व सहभाग मिळविला आहे.
तर 3 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय निवड चाचणीच्या चाचणीस निवड झाली आहे.