१७.५ MW को-जेनरेशन प्लांट क्षमता


वैशिष्ठे

श्री.कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लि., कुडित्रे या साखर कारखान्याची स्थापना 1960 च्या महाराष्ट्र शासनाच्या सहकारी कायद्यान्वये झाली आहे.  सन 1661-62 साली 1000 टन/ दिवस गाळप क्षमतेचा परवाना मिळवला.  कारखान्याच्या सभोवतालील शेतजमीन पूर्ण पणे लहान धरणे, विहिरी व नद्यायांच्या पाण्याचा वापर करुन पिके घेतली जातात.  या कमांड एरीयामध्ये 109 गावे व 51 सलग्न एरियामधील गांवे समाविष्ट आहेत.  त्यांनतर 1967 साली ऊसाचे उत्पन्न वाढत आहे असे लक्षात आलेनंतर कारखान्याची गाळप क्षमता 1750 मेटन प्रतिदिन एवढी वाढवण्यात आली.  त्यानंतर अजून ऊसाचे उत्पादन वाढत आहे हे लक्षात आहे नंतर 1982 साली कारखान्याची गाळप क्षमता 3000 मेटन प्रतिदिन एवढी करण्यात आली व 2015 साली तीच क्षमता 5000 मेटन प्रतिदिन पर्यंत वाढवून घेतली.  कारखान्यामध्ये वाफेचा वापर व वीजेचा वापर कमीत कमी करणेच्या हेतून नवीनतम वीज निर्मिती प्रकल्प उभारणीचा मानस संचालक मंडळाने मनात घेतला व तो निर्मितीसाठी प्रयत्न चालू केला.  हा प्रकल्प रिन्यूएबल एनर्जी सोअरसेस मध्ये मोडत असलेने केंद्र व राज्य शासनाने अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणेचे ठरवले आहे.

नवीन तंत्रज्ञान हे सतत प्रत्येक उद्योगामध्ये येत असते.  त्याचा उपयोग करुन तसेच साखर कारखान्यामध्ये सुधारणा करुन सहवीज प्रकल्प करणेचे काम हाती घेतले.  यामध्ये प्रक्रियेसाठी लागणारी वाफ व वीजेचा वापर कमी होणार आहे.  व्ही.एस.आय. पुणे या संस्थेच्या सल्यानुसार आपल्या कारखान्यासाठी उच्च दाब असणारा बाष्पक 87 के.जी/से.मी. व तासी 100 टन बाष्प निर्मिती तसेच वीज निर्मितीसाठी 17.5 मे.वॅ टर्बाइन या मध्ये कारखान्यासाठी वापर करुन 12.5 मे.वॅट वीज महाराष्ट्र शासनाच्या वीज वितरण कंपनीला विकणेचा माणस आहे. या सर्व सहवीज निर्मितीच्या कामासाठी व्ही.एस.आय. पुणे या संस्थेचा सल्ला घेणेचे संचालक मंडळाचा मानस आहे.

हा प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळया परवानग्या साखर आयुक्त यांचेकडून शुगर फॅक्टरी आधुनिकीकरण व फायनानशियल आणि ऍ़डमिनीस्ट्रेटीव्ह परवानगी दि.5 ऑक्टोबर 2011 रोजी मिळाली आणि मेडाकडून ग्रीड कनेक्टीव्हीटीची परवानगी 23 नोंव्हेबर 2011 रोजी मिळाली आहे.  मूलभूत सुविधा पत्र दि.18 डिसेंबर 2012 रोजी मिळाले आहे.  तसेच महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ यांचेकडून 14 मे 2012 रोजी परवानगी मिळाली आहे.  वीज खरेदी करार पत्र दि.17 नोव्हेंबर 2012 रोजी मिळाले आहे.  अशा प्रकारे प्रकल्प चालू करणेसाठी लागणारी ना हरकत पत्रे मिळवली आहेत.  हे सर्व परवाने मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे भूमीपूजन दि.2 ऑगस्ट 2012 रोजी करुन स्थापत्य कामास सुरुवात केली.

व्ही.एस.आय. पुणे यांनी या प्रकल्पाची डी.पी.आर.प्रमाणे रु.136 कोटी किंमत केली होती. तीच किंमत एन.सी.डी.सी. ने रु. 110 कोटी केली.  आणि शासनाच्या को-जन कमिटीपुढे सर्व खरेदी रु. 106 कोटी मध्ये झाली आहे.  यामध्ये रु. 29 कोटी कारखान्याला कमी खर्च आला आणि संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण करुन प्रकल्प दि.09-12-2013 रोजी कार्यान्वित केला.  त्या पहिल्या सिझनमध्ये 3,64,88,000 युनिटस् वीज निर्मिती करुन 1,83,22,262 युनिट जादा एम.एस.ई.डी.सी.एल.ला पाठवून रु. 10.84 कोटी निधी मिळवला. सिझन 2014-2015 मध्ये 5,06,84,000 युनिटस् वीज निर्मिती करुन 3,02,32,000 युनिट एम.एस.ई.डी.सी.एल.ला विक्रीतून रु. 18.71 कोटी रक्कम मिळाली.


17.5 मेगा वॅट को-जनरेशन यंत्र सामुग्री माहिती


अ) बॉयलर

मेक ईसजेक हेवी इंजिनिअरींग दिल्ली
नं. एम.आर.-15907
हिटींग सरफेस 6090 m2
दाब 87 kg/cm2
तापमान 510° ± 5°C
प्रकार सिंगल पास बॉयलर, ट्रॅवलिंग ग्रेट, बाय-ड्रम, वॉटर टयुब
इंधन बगॅस

ब) टर्बाईन

मेक त्रिवेणी टर्बाईन लि., बेंगलोर
नं. टीएसटी 1150 एच-31
पॉवर रेटींग 17.5 मेगा वॅट
दाब 87  kg/cm2
तापमान 505° C
प्रकार बॅक प्रेशर डब्बल एक्सट्रॅक्शन

क) स्विच यार्ड

जनरेशन लेव्हल 11 केव्ही
पॉवर ट्रान्सफार्मर डेल्टा  मेक
क्षमता 110/11 केव्ही, 18 एमव्हीए, कुलींग-ओएनएएन
ट्रान्समिशन एल.आय.एल.ओ

ड) फ्युएल हॅंडलिंग

मेक न्यू टेक इंजिनीरिंग, हुबळी
क्षमता 90 टी.पी. एच.

इ) वॉटर ट्रीटमेंट: डि. एम. प्लांट

मेक जे.आर.डी.सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस
क्षमता 35 m3 /hr
स्टोरेज 470 + 470 =940 mडी. एम.वॉटर

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.