साखर कारखाना

मागील सिझनमध्ये साखर कारखान्याचे आधुनिकीकरण केले आहे. या पूर्वी प्रतिदिन 3.80 लाख लिटर सांडपाणी बाहेर येत होते. सध्या 3.60 लाख लिटर प्रतिदिन सांडपाणी बाहेर पडते. आधुनिकरणामुळे पाणी प्रदुषण, हवा प्रदुषण, हजार्डस वेस्ट इ.प्रदुषणाची तिर्वता पहिल्या पेक्षा कमी झाली आहे.


पाणी नियोजन

पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यामुळे प्रतिटन क्रशिंग पासून 100 लिटर पेक्षा कमी सांडपाणी बाहेर पडत आहे. हे संपूर्ण सांड पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.


हवा प्रदुषण नियंत्रण

हवा प्रदुषण नियंत्रणासाठी ई.एस.पी. व वेटस्क्रब्रर सारखी आधुनिक संयंत्रणा बसवली आहे. त्यामुळे हवा प्रदुषण नियंत्रीत आहे. आम्ही केप कंडीशन पूर्ण केल्या असून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियंमाचे पालन करीत आहोत.


आसवणी

मागील सिझनमध्ये आमचे जुनी 30,000 लिटर प्रतिदिन क्षमतेच्या आसवणीचे आधुनिकरण ऍ़टमॉसफेरीक डिस्टीलेशन पध्दतीमध्ये केले यामुळे प्रदुषणाचा लोड कमी झाला. पूर्वी 3.60 लाख लिटर प्रतिदिन स्पेंटवॉश बाहेर पडत होता. सध्या 2.55 लाख इतकाच स्पेंटवॉशची निर्मिती होते. यामुळे संपूर्ण स्पेंटवॉश हा खत निर्मितीसाठी वापरला जात आहे.


बायोडायजेस्टर

आसवणीमधून बाहेर पडणाऱ्या स्पेंटवॉशसाठी प्रायमरी ट्रिटमेंट म्हणून बायोडायजेस्टरची उभारणी केली असून यामुळे स्पेंटवॉश मधील ऑरगॅनीक लोड कमी करण्यास मदत होते व मिथेन गॅसची निर्मिती होते. हा गॅस बॉयलरला इंधन म्हणून वापरला जातो.


कंपोस्ट

सेंकडरी ट्रिटमेंट म्हणून सरफेस कंपोस्टींग पध्दत अवलंबली आहे. स्पेंटवॉश, प्रेसमड व कल्चर यांचे मिक्सींग करणेसाठी कंपोस्ट मिक्सींग मशिनचा वापर केला आहे. प्रत्येक सायकलमध्ये 6000 मे.टन प्रेसमडचे कंपोस्ट करता येईल असे कंपोस्टयार्ड बनवले आहे. प्रतिवर्षी 18000 मे.टन कंपोस्ट तयार करुन शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री केले जाते.

आमचे आसवणीसाठी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्रायमरी व सेकंडरी ट्रिटमेंट पध्दतीचा अवलंब केला असून 100% स्पेंटवॉशची निर्गतही कंपोस्ट प्रोसेसमध्ये केली जाते.


बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.