ऊस विकास योजना

चांगल्या प्रतिच्या ऊसाचे प्रति हेक्टर उत्पादन वाढविणेकरिता कारखान्याने सन 1976 पासून ऊस विकास योजना राबविलेली आहे. या व्यतिरिक्त हंगाम 2009-10 पासून कारखाना महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकार यांचे सह्कार्या ने 1,000 हेक्टर क्षेत्रावर "ऊस उत्पादकता वाढ" योजने अंतर्गत पथदर्शक प्रकल्प राबविलेला आहे. ऊस विकास योजना व ऊस पथदर्शक प्रकल्पा करिता कारखान्या मार्फत खालील प्रमाणे ऊस उत्पादक सभासदांना सेवा पुरविल्या जातात.


माती नमुने काढणे

ऊस पिकासाठी योग्य रासायनिक खतांचा डोस देणे, जमिनीतील दोष पाहून त्यावर उपाय योजना करणे या करिता कारखान्याचे कार्यक्षेत्रातील मातींचे नमुने घेवून विनामुल्य माती परीक्षण केले जाते. माती परीक्षण अहवाला नूसार रासायनिक खते, चूना, सुक्ष्म-अन्नद्रव्ये ऊस विकासासाठी दिली जातात.





ऊस बेणे

निरोगी व शुध्द बेण्यामुळे ऊस उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्के वाढ होते म्हणून कारखान्याने स्वता: चे फार्म वर तसेच सभासदांचे फार्म वर पायाभूत बेणे मळे तयार केले आहेत. या बेणे मळ्यांपासून प्रमाणित बेणेमळे तयार करुन त्यातील निरोगी व शुद्ध ऊस बियाणे सभासदांना लागणीसाठी दिले जाते.


ऊस बेणे प्रकिया

ऊस लागण करण्यापूर्वी ऊस बेण्यावर रासायनिक व जैविक प्रकिया केली जाते. त्यामुळे ऊसावरील रोग किडींचे नियंत्रण होते तसेच जैविक प्रकियेमुळे नत्र खताची 25 टक्के बचत होते. या करिता कारखान्याचे गट ऑफिस मधून बाविस्टीन, रोगर, असिटोबॅक्टर, स्फूरद, विरघरणारे जिवाणू इ. चा आवश्यकते प्रमाणे पुरवठा केला जातो.





सरी डोस

ऊसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्या करिता लागणी च्या वेळी रासायनिक खतांचा सरी डोस देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या करिता कारखान्याच्या गटऑफिस मधून सरी डोस करिता इफ्को 10:26:26 इफ्को 12:32:16, युरिया खतां चा पुरवठा केला जातो.





हिरवळीची खते

एकाच जमिनीत वारंवार तेच पीक घेतल्याने, तसेच पाण्याचा अती वापर, असमतोल रासायनिक खतांचा वापर यामुळे जमिनीची प्रत खालावलेली आहे. जमिनी ची प्रत सुधारणे व ऊस उत्पादन वाढविणे या करिता हिरवळी चे खतांची अत्यंत गरज आहे. त्या करिता कारखान्या मार्फत हेक्टर 50 किलो ताग बियाणे पुरविले जाते.




तणनाशके व किटकनाशके

ऊस पिकातील तणांचा योग्यवेळी बंदोबस्त करण्यासाठी तसेच रोग किडींवर नियंत्रण करण्यासाठी तणनाशके व किटक नाशके किफायतशीर दरामध्ये शेतकर्यांना पुरविली जातात. या करिता अट्राटॉप, अग्रोडार, ग्रामोक्झोन, गोल, सेंकॉर, टाटामेट्री इ. तणनाशके व थिमेट, रोगर, इ. किटक नाशकांचा वापर केला जातो.





सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

ऊस पिकाच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश या अन्नघट्कां शिवाय गंधक, लोह, मंगल, बोरॉन या सूक्ष्म अन्न द्रव्यांची ही आवश्यकता असते. म्हणून ही सूक्ष्म अन्नद्रव्ये कारखान्या मार्फत पुरविली जातात. तसेच ज्या जमिनींचा सामू 6.5 पेक्षा कमी आहे अशा जमिनीकरिता कारखान्या मार्फत एकरी 500 किलो चुना पुरविला जातो.





कंपोष्ट खत

जमिनीची प्रत सुधारण्या साठी सेंद्रीय खतांची आवश्यकता आहे. कारखान्यातून बाहेर पडणार्या मळीवर (प्रेसमड) डिस्टीलरी स्पेंट वॉश व जिवाणूंची प्रकिया करुन सातार्डे फार्मवर उत्तम प्रतीचे कंपोष्ट खत तयार केले जाते. सदरचे खत मागणी प्रमाणे सभासदांचे शेतावर क्रेडीटवर पोहोच केले जाते.





कृषी औजारे

जमिनीची योग्य मशागत करण्यासाठी कारखान्यामार्फत बैल नांगर, स्प्रे-पंप पुरविले जातात. तसेच पथदर्शक प्रकल्पातून 20 पॉवर टिलर पुरविले आहेत. पॉवर टिलर व रोटाव्हेटर करिता प्रत्येकी रु. 5,000/- अनुदान दिले जाते.






गोबरगैस योजना

शेती करिता उत्तम प्रती चे कंपोष्ट खत उपलब्ध व्हावे व स्वंयपाकाचे गैसचीही सुविधा व्हावी या करिता कारखान्याने 1978 पासून गोबर गैस योजना राबविलेली आहे. ज्यांचेकडे जनावरे आहेत व गोबगैस सयंत्र बांधणी करिता स्वतःची जागा उपलब्ध आहे अश्या ऊस उत्पादक सभासदांचा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. गोबगैस सयंत्र बांधणी करिता कारखान्यामार्फत मार्गदर्शन केले जाते. प्रत्येक गैस प्लांटला कारखान्यामार्फत रु. 2,500/- (रु.दोन हजार पाचशे फक्त) अज तागायत या योजनेतून 13,878 गोबर गैस प्लांट्स बांधण्यात आले आहेत.

ऊस विकासाच्या सर्व बाबींचा कारखान्याचे मार्गदर्शना प्रमाणे वापर करणार्या उत्पादक सभासदांना, गळीतास आलेल्या ऊसावर टनास रु. 10/- प्रमाणे अनुदान दिले जाते. ऊस विकासाच्या नवीन तंत्रज्ञानाचा शेतकर्यांपर्यंत प्रसार व्हावा या करिता शेतकरी मेळावे व शेतकरी चर्चा सत्र आयोजित केले जातात.


कुंभी-कासारी सेंद्रिय भू सुधारके

रासायनिक खतांच्या वाढणा-या किमती व त्याचा असंतुलित व अतिवापर याचा जमिनीच्या सुपिकतेवर झालेला परिणाम याचा गांभीर्याने विचार करून उत्तम दर्जाचे कुंभी-कासारी गोल्ड , सिल्वर व ब्राँझ ही भू सुधारके तयार करून अल्प दारात शेतक-यांना शेती गटावर विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे.






बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.