• slide
  • slide
  • slide
  • slide
  • slide
  • slide

आमची उत्पादने

  • उत्पादने
    छडी साखर
    • क्षमता: ५000 मेट्रिक ऊस दर दिवशी
    • प्रक्रिया: डबल सल्फिटेशन
  • उत्पादने
    रेक्टिफाइड स्पिरीट
    • ३0 केएलपीडी कॅसकेड फर्मेन्टेशन मल्टीप्रेशर डिस्टिलरी
    • सामर्थ्य: 68.5 ओ.पी. वर
  • उत्पादने
    कंपोष्ट
    • सातार्डे फार्म येथील सरफेस कंपोस्टींग प्लांट
    • कंपोष्ट खत शेतकर्यांना ना नफा ना तोटा तत्त्वावर विकले जाते
  • उत्पादने
    को-जेनरेशन
    • क्षमता: १७.५ MW
    • वीज निर्मिती: 50684000 युनिटस्, विक्री: 30232000 युनिट

आमची ओळख?

  • करवीर निवासिनी श्री महालक्षीच्या कृपाश्रिवादाने आणि राजश्री शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर भूमीत, शिवरायांच्या कार्याचा साक्षीदार किल्ले पन्हाळा, निसर्ग सौंदर्याने नटलेला गगनबावडा तसेच करवीर आणि पन्हाळा या दोन तालुक्यांच्या कुशीत कै. डी. सी. नरके साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या कार्याचा एक उत्तम नमुना म्हणजे 'कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना.'

    'कुंभी व कासारी या दोन नद्यांच्या नावांवरुन कारखान्याचे 'कुंभी-कासारी' असे नामकरण झालेले आहे. या नद्यांना बारमाही पाणी असल्याने येथील प्रदेश सुपीक बनलेला आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चीम बाजूस गगनबावडा रोडवर १२ किलोमीटर अंतरावर कुडित्रे या गांवच्या वेशीवर कारखाना वसलेला आहे. या माळरानाचे कै. डी. सी. नरकेसाहेब आणि त्यांच्या तत्कालिन सहकार्यांनी कारखान्याच्या रुपाने या परिसराचे नंदनवन केले आहे.

    स्वातंत्र्यानंतर देशात पंचवार्षिक योजनांद्वारे उद्योगधंदे उभे करण्यासाठी चालना दिली गेली. त्यातूनच देशात वस्त्रोद्योग, साखर कारखाने उभे राहिले. कै. डी. सी. नरके व त्यांच्या सहकार्यांनी (प्रवर्तक) १९५४ मध्ये कुंभी-कासारी साखर कारखान्याचा प्रस्ताव तयार केला. या परिसरातील लोकांचे जीवनमान ऊंचावणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे ही दुरदॄष्टी ठेवून साखर कारखाना उभा करण्याचा उद्देश ठेवला. आज मागे वळून पाहताना दिसणारी त्याची विकासात्मक फळे पाहिली तर ही निश्चितच अभिमान व गौरवास्पद अशी गोष्ट आहे. कारखान्यामुळे येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक जीवनात निश्चितच स्थित्यंतर झाले आहे. प्रतिदिन 5000 ते 5200 मे.टन क्षमतेने गाळप केले जात आहे.

    साखर धंद्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊन भाग भांडवल गोळा केले. प्रसंगी स्वतःची पदरमोड घातली. यातूनच त्यांची सामाजिक, आर्थिक विकासाबद्दलची आत्मीयता दिसून येते. २० जून १९६० रोजी अथक प्रयत्नांतून कारखान्याची स्थापना करण्यात आली. प्रथमतः प्रतिदिन एक हजार मे.टन गाळपाचे लायसंस मिळविले. १९६२-६३ मध्ये प्रथम गळीत हंगाम घेतला. लोकांना ऊस वाढीसाठी उद्दुक्त करुन त्यांच्यामद्ध्ये जागृती केली. त्याचा परिणाम ऊस उत्पादन वाढीमध्ये होऊन प्रतिदिन ७५० मे.टन गाळ्पाचे पुन्हा लायसन्स मिळविले. ऊस उत्पादन एवढे वाढले की, पुन्हा गाळप क्षमता वाढविणे गरजेचे बनले. १९८० मध्ये प्रतिदिन गाळप क्षमता ३००० मे.टनाचे लायसन्स मिळविले. सन २०१४ मध्ये मशिनरी नुतानीकरण नंतर सद्य स्थित प्रतिदिन गाळप क्षमता ५००० मे.टन आहे.

बातम्या आणि घटना

सर्व हक्क राखीव. कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना लिमिटेड.